लोकाभिमुख प्रशासन
लोकभिमुख प्रशासनाचा मुख्य उद्देश सरकारी प्रक्रिया सुलभ करणे आणि ती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणणे हा असतो. यात प्रशासन केवळ आदेश देत नाही, तर लोकांचा सहभाग वाढवण्यावर भर देते
माहितीचा अधिकार (RTI - २००५): यामुळे सामान्य नागरिकाला सरकारी कामकाजाची माहिती मिळवणे शक्य झाले आहे.
सेवा हक्क कायदा (Right to Services Act): नागरिकांना ठराविक वेळेत (उदा. दाखले, परवाने) सेवा मिळण्याची कायदेशीर हमी मिळते.
ई-प्रशासन (e-Governance): तंत्रज्ञानाचा वापर करून 'आपले सरकार' सारख्या पोर्टलद्वारे घरी बसून सेवा उपलब्ध करून देणे.
लोकशाही दिन: जिल्हा किंवा तालुका स्तरावर नागरिक थेट अधिकाऱ्यांकडे आपल्या तक्रारी मांडू शकतात.